नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करू, असे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. शहा यांनी बिलासपूर, सिमरपूर येथेही सभा घेतल्या. पाकिस्तानने पाच भारतीय जवानांचे शिर कापून नेल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने काहीही केले नाही. मात्र, मोदी सरकारने मात्र बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. पाकिस्तानकडून गोळी आली तर आम्ही तोफगोळ्याने प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानला दुःख झाले, पण काँग्रेस कार्यालयातही दुःख झाले. एअरस्ट्राईकनंतर जणू जवळचेचे कुणी मृत झाल्यासारखा राहुल गांधींचा चेहरा पडला होता. ओमर अब्दुल्ला काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा असे म्हणतात. यातून त्यांची मानसिकता कळते, पण मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास आम्ही कलम ३७० नक्की रद्द करू. शीखविरोधी दंगलीबाबत काही विचारल्यास काँग्रेस झाले ते झाले असे म्हणते.२६-११ च्या हल्ल्याविषयी विचारल्यावरही काँग्रेस जे झाले ते झाले असे म्हणते. या वेळी प्रथमच विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचललेला नाही. कारण मोदींनी सर्व भ्रष्टाचार निपटून काढला आहे. मंडी येथे विमानतळाचा प्रश्न मोदी पंतप्रधान झाल्यावरच मार्गी लागेल