Skip to content Skip to footer

“इंद्राजींना १९७१ च्या युद्धाचं श्रेय देता, मग मोदींनी बालाकोटचं श्रेय का घेऊ नये – मंत्री जितेंद्र सिंह

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी सैन्याने केलेल्या पराक्रमाचे श्रेय घेत आहेत अशी टीका विरोधकांकडून केली गेली होती. सैन्याच्या नावाने मते मागणे हे अतिशय लज्ज्स्पद आहे तसेच सैन्याच्या नावाने मत मागताना नरेंद्र मोदींना लाज वाटत नाही का अशी टीका विरोधकांनी मोदींवर केली होती. या सर्व प्रकरणाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना १९७१ च्या युद्धातल्या विजयाचं श्रेय दिले जाते, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालाकोटचे श्रेय का देऊ नये, असा सवाल जितेंद्र सिंह यांनी विचारला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा जेव्हा शेजारी देशांसोबत युद्धं झाली, तेव्हा त्यातील विजयाचा किंवा पराभवाचा संबंध थेट तत्कालीन सरकारच्या, तेव्हाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीशी जोडण्यात आला. बांगलादेशच्या निर्मितीबद्दल त्यांचे कौतुक केले जाते. असे सुद्धा सिंहा यांनी बोलून दाखविले होते. दरम्यान, भारतीय वायूसेनेने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट केले होते. यात जवळपास ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा केला गेला होता. यामुळे या कामगिरीचे श्रेय मोदींनी का घेऊ नये असा सवाल जितेंद्र सिंह यांनी उपस्थित केला आहे.

Leave a comment

0.0/5