१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना हे एक्झिट पोल आहेत खरे जे निर्णय येतील आणि ते याच आजच्या एक्झिट पोल प्रमाणे असतील का? अजून काही वेगळे असतील का? असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘एक्झिट पोलमध्ये दाखविल्याप्रमाणे अजून काही जास्त चांगले निकाल असतील याचे उत्तर लवकरच आपल्या मिळणार आहे सर्व एक्झिट पोल पाहिल्यानंतर असे लक्षात येते की जो काही अंतिम निकाल येणार आहे तो २३ मे रोजी येणार आहे असे विधान केले आहे. दरम्यान, जनतेचा जो काही कौल असेल तो लोकशाही मध्ये आदरपूर्वक स्विकारणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य असते. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारचे यश भारतामध्ये आणि महाराष्ट्रात दाखवलेले आहे त्याबद्दल अर्थातच मनात आनंद वाटत आहे असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहे.