Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी जोमात अन काँग्रेस कोमात…..

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील निकाल एक्झीट पोलच्या सर्वेक्षणा नुसार शिवसेना आणि भाजपाच्या जागेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि पुन्हा एकदा देशातील जनतेने मोदी यांना बहुमत मिळवून दिलेले आहे.

पण महाराष्ट्रातील निकालाकडे पहिले असता २०१९ च्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाला हवे तेवढे यश मिळवता आलेले नाही आहे. त्यातच त्यांचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादीच्या जागेत मात्र वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी जोमात अन काँग्रेस कोमात अशीच म्हणायची वेळ सध्या आलेली आहे. २०१४ च्या निवडणुकी पेक्षा राष्ट्रवादीच्या जागेत वाढ झालेली दिसून येते. तर दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सुपडा-साफ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आज देशातील सर्वात जुन्या आणि मोठया पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे.

Leave a comment

0.0/5