Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात राष्ट्रवादींने काँग्रेस संपवली ?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्याच्या निकाला नंतर देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व न्युज चॅनेलच्या एक्झीट पोलच्या सर्वे नुसार पुन्हा देशात २३ मे च्या निकालात भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या एक्झीट पोलच्या सर्वे नुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेच्या जागा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पहिल्या पेक्षा अधिक दोन जागा वाढल्याच्या दिसून येते. त्यात काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातून सुपडा-साफ झाल्याचे चित्र एक्झीट पोलच्या सर्वे नुसार दिसत आहे

खरंच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे का? व कोणामुळे, तर राज्यातून काँग्रेस हद्दपार होत आहे. तशी कारणे सुद्धा अनेक आहे. पहिले कारण म्हणजे काँग्रेसच्या नेत्यानं मध्ये नसलेले ताळमेळ, आज काँग्रेस मध्ये गटातटाचे राजकारण आपल्याला पाहायला भेटेल. त्यातच काँग्रेसचे सर्व निर्णय सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेताना दिसत आहे. तसे चित्र लोकसभा निवडणुकीला दिसून सुद्धा आले होते. माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद हे साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. म्हणूनच पवारांचे समर्थक गायकवाड यांना काँग्रेसने पुणे मतदार संघातून डावलले होते.

राष्ट्रवादी पक्षाचा खरा उगम हा काँग्रेसच्या गोटातूनच झालेला आहे. प्रथम राष्ट्र्वादीने काँग्रेसला नावे ठेवली हा इतिहास सर्वानाच माहित आहे. त्यानंतर पुन्हा पवारांनी काँग्रेस बरोबर युती करून केंद्रात १० वर्ष कृषीमंत्री पद भूषविलेले आहे. आज काँग्रेस महाराष्ट्रात पवारांन बरोबर युती करून राष्ट्रवादी फायद्यात आहे तर काँग्रेस तोट्यात आहे. या परिस्थितीचा काँग्रेसने विचार करावा. लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्ष इतका जुना असताना सुद्धा राष्ट्रवादीमुळे कुठेतरी महाराष्ट्रात पीछेहाट होताना दिसत आहे. या पुढे जर महाराष्ट्रात काँग्रेसला टिकायचे असेल तर एकला चलो रे ! ची भुमीका काँग्रेससाठी फायद्याची ठरेल.

Leave a comment

0.0/5