Skip to content Skip to footer

बाळासाहेबांच्या नातवाने गुलाल उधळला आहे पवारांच्या नातवाबद्दल मला काही बोलायचं नाही-विखे पाटील

बाळासाहेबांच्या नातवाने गुलाल उधळला आहे, शरद पवारांच्या नातवाबद्दल मला काही बोलायचं नाही, असे म्हणत काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे. राज्याच्या राजकारणात विखे-पवार यांचा वाद काही नवा नाही १९९१ साली सुरु झालेला हा वाद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने पुढे आला. राष्ट्रवादीने नगरची जागा कॉंग्रेसला न सोडल्याने राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी कॉंग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा दारूण पराभव केला आहे.

नगरमधून सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव करत अपमानाचा बदला घेतला. शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र पवारांना या जागेवर करिश्मा दाखविण्यात अपयश आले. दरम्यान, शरद पवार यांचा नातू पार्थ पवार यांचा मावळमध्ये दारूण पराभव झाला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब विखेंच्या नातवाचा म्हणजे सुजय विखे यांचा दणदणीत विजय झाला आहे. खरं पहिले तर विखे आणि पवार घराण्याचे वाद फार जुने आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी हा वाद काढून पुन्हा नव्या वादाला सुरवात केली आहे. येणाऱ्या काळात हा वाद वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.

Leave a comment

0.0/5