रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणे यांनी निलेश राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचे लक्ष होते. राणेंच्या राजकीय अस्तित्वासाठी देखील ही निवडणूक महत्त्वपूर्ण होती. पण, पराभवामुळे नारायण राणेंची पुढील राजकीय कारकीर्द कशी असणार? त्यांच्या पराभवाची कारण काय? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणे यांच्या पुढे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे तगडे आव्हान होते. पण राणे यांच्या पराभवाची कारणे सुद्धा अनेक आहे. पहिले कारण म्हणजे निलेश यांचे बेताल वक्तव्य, मतदार संघातील जनतेशी बोलताना त्यांची अरेरावी भाषा ही संपूर्ण कोकणातील जनतेने अनुभवलेली आहे. तर दुसरे कारण म्हणजे कार्यकर्त्यांन मध्ये असलेली निलेश राणे यांच्या विषयी नाराजी, त्याचमुळे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.
एकीकडे कोकणात २०१४ प्रमाणे यावेळी ॲन्टी राणे लाट नसताना आणि दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असहकार असतानाही विनायक राऊत यांना २०१४च्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे राणेंचे दुसरे पुत्र नितेश राणे आमदार असलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघात निलेश राणेंना जेमतेम दहा हजारांच्या मताधिक्यांवर रोखण्यात शिवसेनेला यश आले. त्यामुळे राणेंचा निकालाबबतचा हेराफेरीचा आरोप राऊत यांनी धुडकावून लावला आहे.
1 Comment
उमेश चौकडे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती
हो नक्कीच तसेही, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, फक्त राष्ट्रवादी बाकी आहे आता, बाळासाहेब ठाकरे यांना कीती दुःख झाले असेल ज्या नालायक ला आपण महाराष्ट्र च सर्वोच्च पद दिले त्यानेच गद्दारी केली अस बरे नवे राणे साहेब