पवार घराण्याला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला….

लोकसभा | Pawar's family had to face defeat for the first time ....
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना भारी बहुमतांनी निवडून आलेली आहे. त्यातच २००९ च्या लोकसभा निवडणुकी पेक्षा शिवसेनेच्या मतांमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आलेली आहे. या निवडणुकीला राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. परंतु या निवडणुकीत पवार घराण्याच्या तिसऱ्या फळीच्या युवा नेत्याला शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या कडून हार पत्करावी लागलेली आहे.
                     राष्ट्रवादी पक्षा कडून मावळ मतदार संघात अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. परंतु या उमेदवारीला खुद्द शरद पवारांनी नकार दिला होता. पुढे अजित पवार यांच्या हट्टापाइ मावळ मतदार संघातून पार्थ यांना उतरविण्यात आलेले होते. “जो पर्यंत ठेच लागणार नाही तो पर्यंत समजणार नाही” असे भाकीत सुद्धा शरद पवारांनी केले होते. त्यामुळे शरद पवारांना या मतदार संघात आपला पराजय होणार हे माहीतच होते. त्यामुळे शरद पवारांनी या मतदार संघातील जागा गृहीत धरली नव्हती.
                   या मतदार संघात पार्थ पवार यांचा पराजय करून शिवसेना पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी २,१५,९१३ मताधिक्त्यांनी विजय मिळवला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्‍का बसला आहे. प्रथमच पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रामुख्याने यावेळीच्या निवडणुकीत अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली मावळची जागा राष्ट्रवादीला पार्थच्या पराभवामुळे सोडावी लागली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here