लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीत यश राखले असले तरी, या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. तर भाजपाच्या मतांमध्ये काहीही वाढ न झालेली दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या मतांमध्ये ३ टाक्यांची घसरण झालेली दिसून येत आहे. भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळीही दोन्ही पक्षांचे संख्याबळ कायम होते. फक्त यंदा काही विजयी मतदारसंघ बदलले आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या एकूण मतांमध्ये वाढ झाली आहे.
भाजपला २०१४च्या निवडणुकीत राज्यात १ कोटी ३३ लाख मते मिळाली होती. यंदा दीड कोटींच्या आसपास मते मिळाली आहेत. शिवसेनेला गतवेळी १ कोटी मते होती. या वेळी शिवसेनेला १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. काँग्रेसला २०१४ मध्ये ८८ लाख ३० हजार एकूण मते होती. यंदा सुमारे ८८ लाख मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला ७७ लाख मते होती. यंदा सुमारे ८० लाख मते मिळाली आहेत. भाजपबरोबर युती करण्याचा घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी फायदेशीर ठरला आहे. कारण भाजपची साथ मिळाल्यानेच बहुधा शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसते.