Skip to content Skip to footer

बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्याने लोकशाही दृढ झाली-सुभाष देशमुख

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार जेथून निवडून येतात, तिथल्या ईव्हीएम मशिनमध्ये गडबड होत नाही. त्या मशिन चांगल्या असतात; पण जेथे पराभव होतो तेथील मशिनमध्ये घोळ केला जातो, हा बारामतीकरांचा जावईशोधच आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्याने लोकशाही दृढ झाली आहे, असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

बारामती जागेवरून पवारांनी सूचक विधान केले होते. ज्यांनी कधी जनतेतून निवडणूक लढवली नाही, ते नेते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करत आहेत , त्यामुळे अशा लोकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने काही गडबड केली आहे का, ही शंका अनेकांना वाटत आहे. बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरून विश्वास उडेल, असं अजब विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार बोलत होते

Leave a comment

0.0/5