Skip to content Skip to footer

विखे पटील पाडणार काँग्रसला खिंडार……..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झाल आहे. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. विखेंनी मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, अस अब्दुल सत्तार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. यामुळे येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. देशात लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे. अब्दुल सत्तार काँग्रेस सोडून गेले तर काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. यापेक्षा निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला राज्यात गळती तर लोकसभे पाठोपाठ विधानसभेची निवडणूक देखील पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5