Skip to content Skip to footer

बारामती करांनी पळवलेले पाणी दोन दिवसात आणणार-रणजितसिंह नाईक निंबाळकर

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी निवडून आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बारामतीला पळवलेल नीरा-देवधरच पाणी दोन दिवसांत मागारी आणणार असल्याची सिंहगर्जना केली आहे. रणजितसिंह यांनी विजयी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुष्काळी सांगोल्यात उपाययोजना बाबत प्रशासनाची बैठक घेतली यावेळी बोलताना थेट राष्ट्रवादीवर हल्ला चढविला.

 

सत्तेत असताना ठराव करून नीरा देवधरचे चाळीस टक्के पाणी बारामतीला नेले होते. मात्र, या ठरावाची मुदत दोन वर्ष संपूनही ते पाणी बेकायदा वापरले जात आहे. आता दोन दिवसांत हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे, असेही निंबाळकर म्हणाले

Leave a comment

0.0/5