Skip to content Skip to footer

“MTNL” चा अभियंता ते केंद्रीय मंत्री खा. अरविंद सावंत यांचा प्रवास….

लोकसभा निवडणुकीच्या निकालां नंतर दक्षिण मुंबई मधून पुन्हा एकदा जनतेने अरविंद सावंत या आपल्या माणसाला खासदार म्हणून दिल्लीला पाठविले आहे. परंतु खासदार अरविंद सावंत यांची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे. खा.अरविंद सावंत यांनी काँग्रेस अध्यक्ष तथा माजी मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव करत दुसऱ्यांदा आपला गड राखला आहे. खा.सावंत यांच्यावर MTNL कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष पदाची धुरा यांच्या हातात आहे.

अरविंद स्वतः हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तसेच ते पहिल्या पासूनच कित्तेर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मात्र, आज ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांचा हा प्रवास अनेकांचे लक्ष वेधून घेणार आहे. अरविंद सावंत हे १९९५ पर्यंत महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये (एमटीएनएल) अभियंता म्हणून काम करायचे. १९९५ साली विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागल्या नंतर अरविंद सावंत यांनी एमटीएनएल मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवकही झाले. या काळात अरविंद सावंत यांनी एमटीएनएलमध्ये कामगार नेता म्हणून चांगलाच जम बसवला होता

२०१४ ची लोकसभा निवडणूक अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांच्या विरोधात लढवलेली होती. या निवडणुकीत मंत्री असलेल्या मिलिंद देवरा यांचा पराभव करून अरविंद सावंत विजय झाले होते. २०१९ च्या निवडणुकीला अरविंद सावंत पडावे म्हणून मिलिंद देवरा यांनी शिवसेना पक्षाचा आणि सावंत यांचा अपप्रचार केला होता. परंतु सुजाण जनतेने काम करणाऱ्या खासदाराला पुन्हा एकदा निवडून देऊन दिल्लीला पाठिवले आहे आणि आता तेच मंत्री पदाची शपथ घेणार आहे.

Leave a comment

0.0/5