Skip to content Skip to footer

पुढचा एक महिना काँग्रेस प्रवक्त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास बंदी…..

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आणि यांच्या बरोबर असणाऱ्या महाआघाडीच्या सर्वच राजकीय पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. त्यातच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राजीनाम्याचे सत्रच सुरू झाले होते. काही महिन्या पूर्वीच अध्यक्ष पदावर नियुक्ती केलेल्या राहुल गांधी यांनी सुद्धा आपला राजीनामा काँग्रेस कमेटी समोर ठेवलेला होता. परंतु तो एकमताने नाकारण्यात आलेला होता. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांनी सुद्धा महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. आता त्यातच काँग्रेस प्रवक्त्यांना सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

त्यापूर्वी कॉंग्रेसने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या एक महिन्यासाठी ते कोणत्याही कॉंग्रेस प्रवक्त्याला टीव्ही कार्यक्रमांसाठी पक्षाची बाजू मांडण्यासाठी पाठवणार नाहीत. कॉंग्रेसने सगळ्या वाहिन्यांच्या संपादकांना कॉंग्रेस प्रवक्त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करू नये अशी विनंती केली आहे. कॉंग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या निर्णयामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आज काँग्रेस प्रवक्ते सक्षमपणे पक्षाची ठोस भूमिका मांडण्यात असमर्थ ठरलेले आहे. त्याचमुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5