Skip to content Skip to footer

नरेंद्र मोदी मोदी यांच्या शपथविधी नंतर नाशिकमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला…..

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याने ठिकठिकाणच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे आज गुढया उभारुन व शुध्द तुपातले लाडू वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पंचवटी कारंजा येथील सर्कलभोवती सुशोभित रांगोळी काढून भाजपाच्या ध्वजाच्या गुढया उभारुन हे लाडू वाटप झाले. ३०३ उमेदवार लोकसभेत निवडून आल्याने ३०३ शुध्द तुपातले लाडु वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने, भाजपा पंचवटी मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उत्तम उगले, अमित घुगे, विजय बनछोडे, विपुल सुराणा, दिगंबर धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5