Skip to content Skip to footer

राणे पिता-पुत्रांचा पुन्हा एकदा रडीचा डाव…….

लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर राज्यात नाही तर संपूर्ण देशात भाजपा पक्षाने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. २०१४ च्या जागे पेक्षा २०१९ च्या निवडणुकीला भाजपा पक्षाने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यातच भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाला सुद्धा भरघोस यश मिळालेले आहे. तर खासदार विनायक राऊत यांनी विजय मिळवून पुन्हा एकदा कोकणात शिवसेनेचा भगवा उंचावला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात स्वाभिमानी पक्षाकडून नितेश राणे हे प्रतिस्पर्धक म्हणून उभे होते.

२३ मे रोजी लागलेल्या निकाला नंतर नारायण राणे आणि यांच्या मुलांनी पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी शिवसेना पक्षावर चुकीचे आरोप लावणे चालू केले आहे. पण राणे पिता-पुत्र हे पूर्णपणे विसरले आहे की, कोकणाच्या जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. आज नाही ते आरोप करून शिवसेनेला टार्गेट करून चर्चेत राहण्यासाठी नवी शक्कल राणे कुटुंबांनी शोधलेली आहे. पण या उत्तराला शिवसैनिक उत्तर नाही देणार असे होऊ शकत नाही. यावर नगरसेवक अमेय घोले यांनी राणे परिवाराला पुन्हा एकदा निवडणुकीला उतरण्याचे आव्हानच दिलेले आहे.

आज तीन-तीन पक्ष बदलून राणे यांचे राजकीय अस्तित्व संपलेलेआहे. तसेच अख्या महाराष्ट्रातला दिसून सुद्धा आलेले आहे. आता येणाऱ्या विधानसभेला आमदार नितेश राणे यांचा सुद्धा पराभव होणार अशी चर्चा सध्या कोकणात सर्वत्र बोलून दाखवली जात आहे. आज त्यांच्या बरोबर असणाऱ्या आमदारांनी सुद्धा त्यांची साथ सोडलेली आहे. म्हणूनच आज कुठेतरी रडीचा डाव खेळणे राणे परिवाराने चालू केलेला आहे. आज शिवसेना पक्षावर कितीही आरोप लावले तरी “नाणार” सारखा प्रकल्प कोकणा बाहेर काढून पुन्हा एकदा कोकणातील जनतेचा विश्वास शिवसेनेवर अधिकच दृढ झालेला दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5