Skip to content Skip to footer

काँग्रेस बडे नेते दोन्ही पक्षाचे विलीनीकरण मान्य करतील का?

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने सपाटून मार खाल्लेला आहे. त्यातच आता देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समजल्या जाणाऱ्या काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेतेपद वाचवण्या इतके संख्या बळ सुद्धा उरलेले नाही. महाराष्ट्रात आज काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती पहिली तर फक्त ६ खासदार निवडून आलेले आहे. म्हणूनच कुठेतरी भाजपाला भविष्यात रोखण्यासाठी राष्ट्र्वादीने आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्ल्लीत बैठक सुद्धा पार पडली. परंतु अद्याप या विषयी माहिती समोर आलेली नाही.

जर काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी विलीन झाली तर काँग्रेस अध्यक्ष पद शरद पवार यांच्या वाटेला जाऊ शकते. कारण काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्याचा नसावा अशी मागणी खुद्द राहुल गांधी यांची आहे. परंतु या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्ते कशा प्रकारे स्वीकारतात हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. मुळात राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेस पासून विभक्त होऊनच झालेला आहे. तसेच राष्ट्रवादी मधील अनेक नेते हे काँग्रेस आणि इतर पक्षातून बंडखोरी करत पवारांच्या पक्षात सामील झालेले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे विलिनीकरण झाल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी मॅजिक आकडा सहज पार करू शकतात. ते तरी खरे असले तरी ज्या पवारांनी काँग्रेसला नावे ठेऊन काँग्रेस पक्ष फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली त्या पवारांच्या हाताखाली काँग्रेसचे वरिष्ठ नेते अन कार्यकर्ते काम करतील का? हा प्रश्न सुद्धा उपस्तित राहणार आहे. आज महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद दिल्लीतील नेत्यांच्या काना पर्यंत पोहचलेले आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्ष म्हणून पवारांचे आदेश पाळतील का?

आज संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे पसरलेले जाळे मोडीत काढण्याचे काम फक्त शरद पवारांनी केलेले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ५ आणि काँग्रेस पक्षाचा १ खासदार निवडून आलेला आहे. त्यातच पवारांना काँग्रेस अध्य्क्ष पद दिले तर काँग्रेसचा संपूर्ण देशात सुपडा साफ होणार हे सुद्धा नाकारता येणार नाही. यावर काँग्रेस पक्षातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या फळीतील नेते या निर्णयाला तयार होतील का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित राहणार आहे.

Leave a comment

0.0/5