Skip to content Skip to footer

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह भाजपा वाटेवर ?

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेस -राष्ट्रवादीचे अनेक डिग्गज नेते पक्षाला राम-राम करत शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात इनकमिंग -आउटगोइंग चालू झालेली दिसून येत आहे. निवडणुकीच्या निकालाआधी बीडचे डिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी हातातील घड्याळ काढून मनगटावर शिवबंधन बांधून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यातच आता मुंबईतील बडा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली आहे.कृपाशंकर सिंह आणि प्रसाद लाड यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी याचे निकटवर्तीय म्हणून मानले जातात. परंतु त्यांच्यावर काँग्रेसच्या कुरघोडी राजकारणात त्याचा बळी जाऊन त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला होता. परंतु आपल्या राजकीय कारकीर्तीची नवी खेळी खेळण्यासाठी शायतो ते भाजपा पक्षात प्रवेश करू शकतात.

Leave a comment

0.0/5