Skip to content Skip to footer

अखेर कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून वाहतूक सुरु………

अनेक अडचणीचा सामना करत अखेर नव्या शिवाजी पुलावरून वाहतूक सुरु झालेली आहे. हा क्षण कोल्हापूरच्या जनतेसाठी तसेच या पुलामुळे जोडल्या जाणाऱ्या समस्त खेडेगावातील नागरिकांसाठी आनंदाचा दिवस म्हणून पहिला जात आहे. ज्या वेळी जुन्या शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले तेव्हा हा पुल वापरण्यास धोकादायक आहे, म्हणून शेरा देण्यात आलेला होता. तसेच शिवाजी पुल बांधलेल्या कंपनीने सुद्धा महाराष्ट्र शासनाला तसेच सार्वजिन बांधकाम विभागाला पत्राद्वारे सुद्धा सूचित केले होते. त्यामुळे या पूलावरून अवजड वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता तसेच पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात येत होती. या सर्व अडचणीचा खेडे गावात राहणाऱ्या जनतेला खुप नाहक त्रास सहन करावा लागत होता.

त्यातच आता पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाचा मुद्दा ऐरणीवर आला. आंदोलकांचे म्हणणे होते की, पुलाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते व्हावे, तर प्रशासकीय स्तरावर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, गनिमी काव्याने या पुलाचे शनिवारी उद्घाटन करण्याची काही जणांनी तयारी सुरू केली होती. परंतु, सायंकाळी ठेकेदार बापू लाड यांना राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता देशपांडे यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेले अडथळे हटवण्यात आले आणि अखेर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या सर्व अडचणीवर मात करत पर्यायी शिवाजी पुल कोल्हापुरातील जनतेच्या सेवेत कार्यविन झाला आहे.

Leave a comment

0.0/5