काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. त्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना गृह मंत्रालय खाते देण्यात आले आहे. त्यांच्या या मंत्रीपदावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा विश्वास व्यक्त केला होते. अमित शहा यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. असे शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. काल नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तर त्यांच्या सोबत ५७ खासदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
या मंत्रिमंडळात अमित शाह यांना स्थान देण्यात आले आहे. अमित शहा यांना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून अमित शहा यांच्यावर स्तुती सुमन उधळली. अमित शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते तर, शहा यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. असा विश्वास सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
अमित शहा यांनी कश्मीरात ३७० कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल. असा विश्वास त्यातून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अमित शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अमित शाह हे भाजप विजयाचे शिल्पकार असल्याचेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंचा हा विश्वास अमित शहा सार्थ ठरवतील का हे आगामी काळात पाहणे महत्वाचे ठरेल.