Skip to content Skip to footer

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १८ खासदारांसह एकविरा गडावर

लोणावळा : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश देणारी कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,रश्मी ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आले होते.
लोकसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी उध्दव ठाकरे कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे ही त्यांनी त्यावेळी देवीला घातले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या २५ पैकी १८ खासदारांनी भरघोस यश मिळविले

 

. या विजयाचा आनंद व देवीला घातलेले साकडे फेडण्याकरिता उध्दव ठाकरे आज सर्व विजयी खासदारांना घेऊन गडावर आले होते. गडावर देवीची विधिवत पुजा करत देवीची ओटी रश्मी ठाकरे यांनी भरली. यानंतर देवीची आरती करण्यात आली.

Leave a comment

0.0/5