लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली आहे.या मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तसेच आता विविध राज्यांमधील राज्यपालांची अदलाबदल करण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रच्या राज्यपालपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे.
सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी असणार आहेत. कारण सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचं राज्यपाल करावे, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे. तर महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आल्याने महाराष्ट्रा कडूनही त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. कारण महाजन या मध्यप्रदेश इंदौरच्या असल्या तरी महाराष्ट्राशी त्यांच जवळचे नातं आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे विद्यासागर राव हे आहेत.