Skip to content Skip to footer

शून्य अधिक शून्य एक होत नसतो, मुनगंटीवारांचा राष्ट्रवादी-काँग्रेसला टोला…..

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे. सध्या काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्ष नेता निवडता येईल इतके संख्याबळ सुद्धा राहिलेले नाही आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवाराचा न निवडता गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्ती निवडण्याचे ठरविले आहे. आता राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार अशा चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. या संदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत बैठक सुद्धा पार पडली आहे.

या सर्व घडामोडीवर बोलताना राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शून्य अधिक शून्य कधीही एक होत नाही. तशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. विलीनीकरण जरी झालं तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी राज्यात शक्तीहीन आहे. विधानसभेला त्यांची लोकसभेसारखीच गत होणार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस जाणीव राष्ट्रवादीच्या या निर्णयाची खिल्ली सुद्धा उडवली आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये मोदींच्या शपथविधी दिवशी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये विलीनीकरणाची डाळ शिजत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र या बातमीचे खंडन करत शरद पवारांनी विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याच सांगितल होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुंबई येथे आज बैठक होत आहे. यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित आहेत. या बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणता निर्णय होतो का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5