लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्री मंडळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची सुद्धा केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झालेली आहे. त्यातच येत्या चार-पाच महिन्यावर येऊन राहिलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागेची चर्चा महायुतीत चालू झालेली आहे. शिवसेना भाजपा मित्रपक्षाला १८ जागा सोडून उर्वरित १३५-१३५ जागेवर निवडणूक लाडवणार आहे. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा नेते चंन्द्रकांतदादा पाटील यांनी दिलेली आहे.
विधानसभेला शिवसेना-भाजपा युतीमुळे लोकसभेला घडलेला करिष्मा पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. भाजप-शिवसेना विधानसभेत एकत्रच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. एकूण २८८ जागांवर युती लढेल. त्यातील १८ जागा या युतीतील मित्रपक्षांना सोडण्यात येतील, असे त्यांनी मराठवाडा दौऱ्याला पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकीकडे विधानसभेला शिवसेना-भाजपा युतीच्या जागेवर चर्चा होत असताना, दुसरीकडे काँग्रेसचा नवा प्रदेशाद्यक्ष कोण ? यावर अजून काँग्रेस मध्ये एकमत झालेले दिसून येत नाही