“नाचत येईना अंगन वाकडे” शरद पवारांना मुनगंटीवार यांचा टोला..

सुधीर मुनगंटी |

लोकसभा निवडणुकीच्या पराभवा नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा ईव्हीएम मशीनवर पक्षाच्या पराजयाचे खापर फोडले आहे. मुंबईत सर्व विजयी खासदार तसेच पराजय झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पराजयाचे कारण तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीची रूपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. “मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाची निवडणूक जिंकण्यासाठी तर नाही” असे मत शरद पवारांनी व्यक्त करत भाजपा पक्षावर निशाणा साधला होती.

या पवारांच्या आरोपाला भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडे-तोड उत्तर दिले आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून पवारांनी ईव्हीएमला दोष दिला आहे असे ते म्हणाले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वर्ध्याचे पालकमंत्री असून वर्ध्याला आल्यानंतर त्यांना शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे’ असे साधारणत पवारांचे राजकारण सुरू आहे. ४७ वर्षे यांच्या हातात राज्याची सत्ता होती पण अद्यापही यांना आम्ही राज्याचे सगळे प्रश्न सोडवले असा दावा करता येत नसल्याचीही टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here