Skip to content Skip to footer

शरद पवारांना अजूनही ईव्हीएम बद्दल शंका…..

मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीला खुद्द शरद पवार सुद्धा उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणे तथा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीती बद्दल ही बैठक बोलावण्यात आलेली होती.

या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे कारण ईव्हीएम मशीनवर फोडले आहे. ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपाची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाची निवडणूक जिंकण्यासाठी तर नाही, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत शंका उपस्थित केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’वर पोस्ट करत निवडणुकीतील ईव्हीएम वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या तीन राज्यांत भाजपचा पराभव करत काँग्रेसने सत्ता मिळवली. आता त्याच राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाल्याकडे लक्ष वेधत ईव्हीएमच्या वापराबाबत पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला.

Leave a comment

0.0/5