Skip to content Skip to footer

किल्ले राजयगडावर ५ आणि ६ जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा……..

शिवराज्यभिषेक मोहत्सवाचा वतीने येणाऱ्या ५ आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यंदा ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवभक्तांकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मदतीसाठी निधीदेखील गोळा करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्रालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत या सोहळ्याची माहिती दिली.

\
राज्यात सध्या दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांचा राजसदरेवर प्रतीकात्मक सन्मान करण्यात येणार असून शिवभक्तांकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मदतीसाठी निधीदेखील गोळा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन ते चार लाख शिवभक्त सोहळ्याला येतील. त्यासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ६० वस्तादांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्णनाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व जातीधर्मातील लोक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5