Skip to content Skip to footer

काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपाच्या वाटेवर ?

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले ८ ते १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडाली आहे. तर, राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वानं पक्षाला संपवल्याचा आरोप देखील सत्तार यांनी यावेळी केला आहे. एका खाजगी वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्तार नाराज होते. त्यानंतर त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांसह खलबतं देखील केली. यावेळी भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर देखील हजर होते. त्यामुळे काँग्रेसच्या काही आमदारांसह राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

Leave a comment

0.0/5