लोकसभा निवडणुकीच्या पराजयाचे खापर सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष वंचित बहुजन आघाडीवर फोडत आहे, तर दुसरीकडे आमच्या उमेदवारांच्या पराभवाला काँग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार आहे असे आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षावर लावलेले आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे १० आमदार संपर्कात असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. एका खाजगी मराठी वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असून त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे आंबेडकर यांनी म्हंटले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आगामी रणनीती ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांच्या या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ माजली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जर हे आमदार वंचित मध्ये सामील झाले तर, हा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का असेल असेच राजकीय वर्तुळात बोलू दाखविले जात आहे.