Skip to content Skip to footer

अखेर राधा-कृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा……..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षा बरोबर काडी-मोड घेऊन सुजय विखे-पाटील आपल्या मुलाला भाजपाच्या तिकिटावर लोकसभेला निवडून आणून अखेर आज राधा कृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला नगर मध्ये काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे. आज विधानभवनात विधानसभा अध्यक्षांशी भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्त केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मुलाला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर विखे-पाटील मनाने काँग्रेसपासून दूर गेले होते. पक्षात राहून त्यांनी उघडपणे भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या आपल्या मुलाचा व शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला होता. देशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आल्यानंतर तसेच, मुलगा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते.

अलीकडेच नगरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांनी चर्चाही केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधील आमदार, नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. आज आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी पुढचे पाऊल टाकले. आता त्यांच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता उरली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना पुण्याचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5