Skip to content Skip to footer

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या १८ खासदारांनसह घेणार कोल्हापुरच्या आंबाबाईचे दर्शन.

शिवसेना-भाजपा महायुतीची पहिली सभा करवीर निवासिनी अंबाबाई यांच्या कोल्हापूर शहरात पार पडली. कोल्हापुरातील दोन्ही जागा ह्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीला खेचुन आणल्या आहेत. तसेच आपल्या कोल्हापुरातील पहिल्या सभेला उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व विजयी खासदारांना सोबत घेऊन आंबाबाईच्या दर्शनाला येणार असे सुद्धा बोलून दाखविले होते. तोच दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी सकाळी दहा वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ खासदार देखील अंबाबाईचे दर्शन घेणार आहे.

काँग्रेसचा गड म्हणून कोल्हापूरची खरी ओळख. पण, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर कब्जा केला. १९५२ मध्ये पहिल्यांदा इथे काँग्रेसचे रत्नाप्पा कुंभार निवडून आले. त्यानंतर दोन निवडणुका सोडल्या तर १९९९ पर्यंत इथे काँग्रेसचे वर्चस्व होते. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. तिसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार होते. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत कोल्हापूरमध्ये विजय मिळवला. संजय मंडलिक हे कोल्हापुरातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत

Leave a comment

0.0/5