Skip to content Skip to footer

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव.?

काँग्रेस पक्षा समोरील अडचणी निवडणुकीच्या काळा नंतर सुद्धा संपण्याचे चिन्ह दिसून येत नाही आहे. मंगळवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने १३ व्यांदा चौकशी केली. या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाल्याची माहिती समोर आली आहे. वाड्रा यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सी.सी. थंपी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवाने वाड्रा यांची ओळख करुन दिली असल्याची माहिती चौकशी दरम्यान दिली आहे. रॉबर्ट वाड्रा यांची दुबई व लंडन येथे बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. वाड्रा यांनी दुबईत १४ कोटींचा व्हिला आणि लंडन येथील ब्रेस्टंन स्कवॉयर येथे २६ कोटींचा फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.

व्यावसायिक सी. सी. थंपी यांनी मनी लाँड्रिंग आणि बेहिशोबी मालमत्ता खरेदी करण्यासाठी वाड्रा यांना मदत केल्याचा आरोप आहे. ई़डीने केलेल्या चौकशीत वाड्रा आणि थंपी यांच्या जबाबात विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. ईडीने कोर्टात हे जबाब साक्ष म्हणून सादर केले आहेत. या विरोधाभासी जबाबामुळे तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून वाड्राला ताब्यात घेण्याची मागणी ईडीने केली आहे. दरम्यान, रॉबर्ट वाड्रांना उपचारांसाठी परदेशात जाण्यास सीबीआय कोर्टाने परवानगी दिली आहे. वाड्रांच्या या परदेशवारी आधीच ईडीकडून त्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे

Leave a comment

0.0/5