Skip to content Skip to footer

संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करू – चंद्रकांत खैरे

लोकसभा निवडणुकीत पराभवावर बोलण्याची ही वेळ नाही. त्यावर मी नक्कीच बोलेल पण ज्यांनी या संभाजीनगर मध्ये वेगळा झेंडा फडकवण्याची धमकी दिलेली आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभेला सडेतोड उत्तर देऊ, जीवाचे रान करून आणि पुन्हा येणाऱ्या विधानसभेला संभाजीनगर मध्ये भगवा डौलाने फडकत ठेऊ. असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महानगर पालिकेत स्थायी सभापतींच्या निवडणुकी नंतर ते प्रथमच बोलत होते.

पराभवानंतर प्रथमच ते महानगर पालिकेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते बोलले की, निवडणुकीतील पराभवावर आता आपण काहीच बोलणार नाही. योग्य वेळ आली की, नक्की बोलेल. महानगर पालिकेत मी लुडबुड करतो असे आरोप माझ्यावर लावला जात आहे. परंतु मी कधीच इकडे लक्ष घालत नाही, त्यामुळे मी लुडबुड करतो हे बोलणे चुकीचे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर शहरावर प्रचंड प्रेम होते. आणि त्यांच्या संभाजी नगरात या पुढे भगवा फडकत राहिला पाहिजे हीच माझी जबादारी आहे. असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5