Skip to content Skip to footer

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली दुष्काळ संदर्भात नेत्याची आणि पदाधिकाऱयांची बैठक.

राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिवसेनेने नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे दुष्काळी बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी आणि मंत्री देखील उपस्थित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत सरकारच्या दुष्काळी उपाययोजना दुष्काळग्रस्तांपर्यंत लवकरात लवकर कशा पोहोचवता येतील याबाबत चर्चा होणार आहे. आज शिवसेना तसेच युवासेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात मदत पुरवत आहे.

वातावरणातील वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्णतेची दाहकता वाढली आहे. त्यामुळे राज्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस देखील सरासरीपेक्षा कमी असणार आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस जर कमी झाला तर राज्याला अवर्षणाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी तातडीने दुष्काळी आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.

दरम्यान दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एकदा दुष्काळ निधी मंजूर झाला आहे. केंद्राकडून २१६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दुष्काळी उपाययोजना करताना केंद्राच्या या निधीचा वापर करता येणार आहे .केंद्राकडून एकूण ४२४८.५९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे.

Leave a comment

0.0/5