लोकसभा निवडणुकीच्या यशा नंतर काही महिण्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपा पक्षात जागा वाटपा वरून मतभेद आहेत अशी बातमी सध्या सर्वत्र दाखविली जात आहे. परंतु या विषयावर खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पडदा टाकला आहे. जागा वाटपा वरून महायुती मध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे आदित्य ठाकरे यांच्या कडून सांगण्यात आले आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूकही शिवसेना- भाजप मिळून लढणार आहे
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती किती-किती जागांवर लढणार आहे हा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा विधानसभा निवडणुकीच्या जागेचा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हणत १३५ – १३५ जागांवर सेना-भाजप, तर उरलेल्या १८ जागांवर मित्रपक्ष लढणार असल्याचे म्हंटले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून सेना- भाजपमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात होते. मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जागावाटपावरून शिवसेना-भाजप महायुतीमध्ये कोनतेही मतभेद नाहीत. असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.