लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवनिर्वाचित निवडून आलेल्या सर्व खासदारांना बरोबर घेऊन अयोध्येला राम लल्लाचे दर्शन घेण्यसाठी जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. काही दिवसापूर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार आपल्या विजयी खासदारांन सोबत एकविरा आईचे दर्शन घेतले होते. तसेच येत्या गुरुवारी शिवसेनेच्या विजयी खासदारांना घेऊन ते करवीर निवासिनी आंबाबाईचे दर्शन घेणार आहे.
शिवसेनेच्या विजयात कोल्हापूर शहराला अधिकच महत्व प्राप्त झालेले आहे. कारण शिवसेना-भाजपा महायुतीची पहिली जाहीर सभा ही कोल्हापुर नगरीत पार पडली होती. तसेच कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकावा हे स्वप्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते आणि झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन्ही जागेवर शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या असंख्य शिवसैनिकांन सोबत अयोध्या वारी सुद्धा केली होती.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेंगाळत असलेल्या राम मंदिराच्या मुद्द्याला हात घालून लोकसभा निवडणुकीच्या आधी अयोध्या वारी सुद्धा केली होती. तसेच शरयू नदीकाठी आपल्या संपूर्ण परिवारासह नदीकाठी आरती सुद्धा केली होती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपल्या विजयी उमेदवारांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार म्हणून बोलून दाखविले