Skip to content Skip to footer

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या दुष्काळी भागाचा दौरा करणार…….

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना धावून अली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ९ जून रोजी दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात जालना, धाराशीव, संभाजीनगर, बीड, सोलापूर, नगर, सांगली, सातारा आणि नाशिक या दुष्काळी भागातील चारा छावण्यांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

जालना जिह्यातील साळेगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्य वितरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापूर जिह्यातील अन्नधान्य वितरणाची सुरुवात करण्यात येणार आहे. या जिह्यातील मोहोळ, सोलापूर दक्षिण आणि उत्तर, अक्कलकोट तसेच बार्शी तालुक्यातील दुष्काळपीडित शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार आहे. धाराशीव जिह्यातील भूम तालुक्यातील हंडुग्री, वालवड आणि चिंचपूरढगे तसेच सोलापूर जिह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा, पंढरपूर या तालुक्यांतील चारा छावण्यांना भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे.

शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, शिवेसना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुनील प्रभू हे वितरणाचे नियोजन करत आहेत. तर शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे नगर जिह्यात उपस्थित राहून वितरणाची व्यवस्था पाहणार आहेत

Leave a comment

0.0/5