येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या इंधवे येथील छायाबाई जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सभापती छाया राजेंद्र पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी छायाबाई जितेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
७ रोजी दुपारी ३ वाजता सर्व सदस्यांची बैठक पिठासन अधिकारी तहसिलदार अनिल गवांदे यांनी घेतली. यावेळी यावेळी छायाबाई जितेंद्र पाटील यांचेसह सुनंदा पांडुरंग पाटील, अशोक नगराज पाटील, छायाबाई राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, प्रमोद रमेश जाधव, रेखाबाई देविदास भिल आदी सभागृहात उपस्थितीत होते. भाजपच्या सदस्या सुजाता बाळासाहेब पवार मात्र गैरहजर होत्या.
ही निवड जाहीर होताच ढोलताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी छाया पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जि. प .सदस्य डॉ हर्षल माने , कृ उ बा चे सभापती अमोल पाटील , जि. प .सदस्या रत्नाबाई रोहिदास पाटील, संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, उपसभापती मधुकर पाटील, प्रा आर. बी. पाटील, चेतन पाटील, सुधाकर पाटील , डॉ. पी .के .पाटील, पांडुरंग पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते .
यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, ४० वर्षानंतर राजकीय घडामोडीत ही ऐतिहासिक ही घटना आहे . सर्व पक्षीय सदस्य एकत्रित येऊन सभापती पदाचा उमेदवार बिनविरोध निवडून दिला. एक राजकीय परिपक्वता यातून दिसून आली आहे. आणि छायाबाई राजेंद्र पाटील यांचे राजीनामा दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी डॉ. हर्षल माने व चतुर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शब्द पाळला.
गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छायाबाई राजेंद्र पाटील या शिवसेनेचा टेकू घेऊन सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. १ वर्षासाठी कालावधी संपल्यावर ठरल्याप्रमाणे त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. आणि शिवसेनेच्या सदस्या छायाबाई जितेंद्र पाटील यांना सभापती होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मदत करीत दिलेला शब्द पाळला हे विशेष.