Skip to content Skip to footer

यंदा कोल्हापूरच्या दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत……

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा केली. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. यामध्ये प्रमुख नावं आहेत, ते म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची. या दोघांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वाट्याला येणारी मंत्रिपद शिवसेनेकडून कोल्हापूरला देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि हातकणंगलेचे आमदार सुजीत मिणचेकर यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला भरभरुन दिलेल्या कोल्हापूरला शिवसेना काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5