जो पर्यंत पाऊस पडून चारा छावणी बंद होत नाही तो पर्यंत शिवसेना चारा छावणी मधील शेतकऱ्यांना जेवण देईल अशी घोषणा युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आहे. काल आदित्य ठाकरे यांच्या हस्ते “बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना”चा शुभारंभ करण्यात आला होता. तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून शिवसेना आपल्या पाठीशी भक्कम उभी आहे असे वचन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.