Skip to content Skip to footer

माण-खटाव तालुक्यातील म्हसवड शहरामध्ये मंत्री विजयबापू शिवतारे आणि प्रा. नितिन बानगुडे पाटील यांची दुष्काळी भेट……

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिऊन येत होती. या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तथा पदाधिकारी यांना महाराष्ट्रातील दुष्काळ भागात जाऊन तेथील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यातूनच शिवसेना तर्फे चारा वाटप, पेंड वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील १२ महिने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा माण – खटाव तालुक्यातील म्हसवड शहरात जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री विजयबापू शिवतारे तसेच शिवसेनेचे उपनेते सातारा,सांगली जिल्हा संपर्क प्रमुख तथा कृष्ण-खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी भेट देऊन पेंडीचे वाटप केले. तसेच तेथील स्थानिक शिवसैनिकांशी सुद्धा संवाद साधला. यावेळी
मा. रणजीत देशमुख, सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, म्हसवड नगर पालिकेचे नगरसेवक गणेश रसाळ, माण-खटाव क्षेत्रप्रमुख सचिन भिसे व तमाम शिवसैनिक उपस्थित होते. त्या यानंतर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, दुष्काळ, बेरोजगारी या विविध मुद्यांवर चर्चा करत असताना सर्व सामान्य जनते प्रमाणे शिवसेना कार्यालयांमध्ये मनसोप्त चहा, भेळ आणि भजीचा आस्वाद घेतला.

Leave a comment

0.0/5