Skip to content Skip to footer

वाढदिवस विशेष: दिग्गज नेत्यांनाही न जमलेल्या या गोष्टी आदित्य ठाकरे यांनी करून दाखवल्या, नक्की वाचा

शिवसेनेचे युवा नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आदित्य ठाकरे यांची युवा वर्गात क्रेझ असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे. सध्याच्या जमान्यात गल्लोगल्ली स्वतःला युवा नेते म्हणवून घेणारे सापडतात पण एक दोन नव्हे तर तब्ब्ल १२ वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वी राजकीय आणि सामाजिक वारसा सांभाळणारे आदित्य ठाकरे हे सर्वांपेक्षा नक्कीच उजवे ठरतात. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना इतर युवा नेत्यांपेक्षा वेगळं आणि यशस्वी ठरवणारे काही मुद्दे आपण जाणून घेऊया:

युवा नेतृत्व: आदित्य ठाकरेंचं वय हे त्यांच्या यशामागचं आणि लोकप्रियतेमागचं महत्वाचं कारण मानलं जातं. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवा वर्गाला आदित्य ठाकरे हे त्यांच्यातले वाटतात. शिवसेनेची युवासेना सोडून इतर कोणत्याही पक्षाकडे या वयोगटातील अनुभवी युवानेता नाही.

aaditya-thackeray-birthday-आदित्य ठाकरे

सिनेट निवडणुकीतील विजय: मुंबई विद्यापीठाच्या दोन सिनेट निवडणूका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने लढवल्या. यातील पहिल्या निवडणुकीत त्यांनी मनसेला धूळ चारत १० पैकी आठ जागांवर विजय मिळवला तर, दुसऱ्या वेळी सर्वच्या सर्व १० जागांवर भगवा फडकावत मनसे आणि भाजप परिवारातील अभाविप-ABVP या विद्यार्थी संघटनांचा सुपडासाफ केला. भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना राज ठाकरे आणि अभाविप-ABVP कडून विनोद तावडे यांनीही या निवडणुकीत नेतृत्व केलं होतं पण कोणालाही इतकं प्रचंड यश मिळवता आलं नाही हे येथे उल्लेखनीय.

युवासेनेचं संघटन: युवासेनेची स्थापना २०१० मध्ये झाली. गेल्या ९-१० वर्षांत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर केलेल्या दौऱ्यांमुळे युवासेनेच्या राज्यभर शाखा आणि कार्यकर्ते आहेत. त्याशिवाय देशातील अनेक प्रमुख शहरात युवासेना कार्यरत आहे. युवासेनेआधी ४ वर्ष स्थापन झालेल्या आणि राज ठाकरेंसारखं करिश्माई वक्तृत्व असलेला नेता लाभलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही युवासेनेऐवढं संघटन उभं करता आलं नाही. युवासेनेच्या या तरुणांच्या फळीचा शिवसेनेला निवडणुकीत प्रचंड फायदा झाला तर मनसेला संघटन नसल्याने जनाधार मिळाला नाही.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार – आदित्य ठाकरे

मोठ्या जबाबदाऱ्यांची यशस्वी पूर्तता: मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१२, लोकसभा निवडणूक २०१४, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४, मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७ इत्यादी प्रमुख निवडणुकांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल आदित्य ठाकरेंनी प्रचाराची तसेच पक्षाची जबाबदारी यशवीरित्या पेलली. राज्यभर त्यांच्या सभा, रोड शो, आदित्य संवाद सारखे कार्यक्रम तरुणाईची प्रचंड गर्दी खेचतात.

देश पातळीवरील लोकप्रियता: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची लोकप्रियता राज्याबाहेरही आहे. राजस्थानमधील विद्यापीठात सिनेट निवडणुकीत युवासेनेचा उमेदवार निवडून आला. राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर पोचली आणि शिवसेनेच्या अगदी जगभर गाजलेल्या अयोध्या दौऱ्यात तर आदित्य ठाकरेंनी शिवसेना-युवासेनेच्या शाखांचं उदघाटन करत शिवसेनेला राज्याबाहेर पोहोचवण्याचा मानस दाखवला.

 

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाच्या चर्चेला शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात आलं होतं तेंव्हा भाजपने वयावरून त्यांच्या मिशन १५१ ची थट्टा केली होती पण, पाचच वर्षात आदित्य ठाकरे थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून संसदेत बसलेले दिसले हेच आदित्य ठाकरेंच्या यशाचं चालतं बोलत उदाहरण म्हणावं लागेल.

 

5 Comments

  • Ajay S Kashid
    Posted June 12, 2019 at 7:06 pm

    Best

Leave a comment

0.0/5