युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी होणारा वाढदिवस हा समाजपयोग कामातून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती युवासेना मार्फेत देण्यात आलेली आहे. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या वाढदिवसाचे बॅनर न लावता त्याऐवजी महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळग्रत भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचे आव्हान केलेले आहे.
याच आदेशावरुन वरुण सरदेसाई, अंकित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाअधिकारी सागर बहिर यांनी युवासेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्यांना बि-बियाणे वाटप, १ हजार वृक्ष लागवड व संगोपन, शालेय साहित्य वाटप, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, स्वच्छता अभियान आदी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहेत. आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी दुकाळग्रस्थ भागातील जिल्ह्याचा दौरा सुद्धा केला होता.