Skip to content Skip to footer

खासदार अमोल कोल्हे राज ठाकरे यांच्या भेटीला कारण अजुन गुलदत्यात…..

लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी कडून विजय झालेले नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला “कृष्णकुंज” वर गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीला मनसे तर्फे पुणे मतदार संघात सभा सुद्धा घेण्यात आलेली होती. त्या घेतलेल्या सभे बद्द्ल आभार व्यक्त करण्यासाठी कोल्हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.

सध्या सर्वांचे लक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकड़े लागलेले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीला महाआघाड़ी असून सुद्धा कांग्रेस १ अणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ४ जागा आलेल्या होत्या. त्यामुळे हीच परिस्थिती येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादीची होऊ नये म्हणून महाआघाडीत सामिल होण्याच्या बोलणीसाठी अमोल कोल्हे यांना राज ठाकरे यांच्या भेटीला शरद पवार यांनी पाठविले होते
अशीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. यावर राज ठाकरे काय निर्णय घेणार आहेत हे येणाऱ्या थोड्या दिवसात दिसून येईल. परंतू राज ठाकरे जर कांग्रेस -राष्ट्रवादी बरोबर महाआघाडीत सामिल झाले तर महाराष्ट्राची जनता महाआघाडीला स्वीकारेल का ? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5