बारामती तालुक्याला मिळणारे बेकायदेशीर पाणी रोखण्यात आलेले आहे. नीरा डाव्या कालव्याच्या वादप्रकरणी राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाजन यांनी आदेश काढले आहेत. या आदेश नंतर पवार काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.