लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव झाल्यावर सुद्धा काँग्रेस पक्षाने येणारी विधानसभा राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढण्याचे ठरविले आहे. या निर्णयाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला असताना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये जागावाटपा वरून बिवचले आहे.
विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. या चर्चेत मुंबईतल्या जागांववरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईत जागावाटप समसमान पातळीवर व्हावे असे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.