Skip to content Skip to footer

जनतेला वेठीस ना धरता त्वरित पर्यायी व्यवस्था करा – खा. राहुल शेवाळे

कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने बंद केलेल्या पादचारी पुलांमुळे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. “पूल बंद करण्याचा निर्णय हा सुरक्षेच्या कारणास्तव घेतला असला तरीही नागरिकांना त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी” अशी सूचना खासदार राहुल शेवाळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना केली आहे. गुरुवारी खासदार शेवाळे यांनी संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, दक्षिण- मध्य मुंबईतील बंद केलेल्या पादचारी पुलांची पाहणी करताना अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत.

सीएसटी स्थानाकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील अनेक पूल बंद करण्यात आले. वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील सुमारे १५० मीटरचे दोन पादचारी पूल धोकादायक ठरवून गेल्या ४ महिन्यांपासून रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने बंद केले आहेत त्याला पर्यायी उपाय, किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पादचारी पूल बंद असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी नजीकच्या माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी अशा अनेक जनतेच्या मागण्या खा. शेवाळे यांच्या कडून मांडण्यात आल्या.

गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात खासदार राहुल शेवाळेंसह विभागप्रमुख मंगेश सातमकर, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, नेहल शहा, उर्मिला पांचाळ,मध्य रेल्वेचे सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर श्री. गर्ग, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कार्यकारी अभियंता श्री. गरडे, मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री. भरडे, मुख्य अभियंता श्री. दराडे, सहाय्यक आयुक्त श्री. दिघावकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5