लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कांग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडलेल्या दिसून येत होत्या. प्रथम कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचे सूत्र चालू झाले होते. त्यापाठोपाठ इतर राज्यातील अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सूत्र चालू केले होते. त्यात आता पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल खचण्यासारखे वक्तव्य केले आहे.
प्रियंका गांधी-वढेरा यांनी बुधवारी लोकसभा निडवणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा ठपका कार्यकर्त्यांवर ठेवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपले पुर्णपणे योगदान दिले नाही. त्यामुळेच काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागेल असे प्रियंका यांनी म्हटले आहे. आज आपल्या जीवाचें रान करुण कॉंग्रेसला विजय करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान प्रियंका गांधी यांनी केलेला आहे.
रायबरेली येथील काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी प्रियंका बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मला या ठिकाणी कोणतेही भाषण करण्याची इच्छा नव्हती, पण तरी देखील मी बोलण्यास तयार केल्याने आता मला खर बोलु द्या आणि खर हे आहे की या ठिकाणची निवडणुक ही सोनिया गांधी व रायबरेलीच्या जनतेमुळे जिंकता आली आहे.
काहीशा निराश दिसलेल्या प्रियंका या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींचा विजय झाल्यानिमित्त अभिवादन रॅलीसाठी आल्या होत्या. यावेळी प्रियंकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम न करणा-यांची नावे त्या नक्कीच शोधुन काढतील, असेही सांगितले. परंतू प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यमुळे कुठेतरी कांग्रेस कार्यकर्त्यांची मने काहीशी प्रमाणात दुखावली गेली आहे.