लोकसभा निवडणुकीला हातकलंगने मतदार संघातून माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिवसेना उमेदवार ध्येयशील माने यांनी एक लाख मतांनी पराभव केला होता. या पराभवाची चर्चा राज्यात नाही तर संपूर्ण देशात होत होती. या पराभवाला राजू शेट्टी हे स्वतः कारणीभूत आहे. कारण आज पर्यंत ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारखानदार वर्गा विरोधात शेट्टी शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होते. आज लोकसभेला राजू शेट्टी यांनी कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर गट्टी करुन कुठेतरी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला होता अणि त्याचीच क़ीमत राजू शेट्टी यांना लोकसभेला पराभूत होऊन चुकवावी लागली होती.
आज पुन्हा शेट्टी विधान सभेला तीच चूक करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होते. ते पत्रकारांशी बोलत होते. लवकरच आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. परंतू वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या सोबत येणार किंवा नहीं यावर अजुन सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्याचमुळे शेट्टी विचार करत असलेली युती होणार का? हे अजुन गुलदसत्यात आहे
आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे, वंचित यांच्या बरोबर स्वाभिमानची होणारी आघाड़ी जनता स्वीकारल का? कारण स्वाभिमान सोबत असलेला शेतकरी वर्ग लोकसभेला शेट्टी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे नाराज़ झालेला होता. अणि पुन्हा तीच चुकी शेट्टी करताना दिसत आहे म्हणून या निर्णयामुळे स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रात संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. म्हणूनच याच चूकीमुळे शेट्टी यांना मोठी कीमत विधानसभेला महाराष्ट्रात चुकवावी लागणार आहे.