Skip to content Skip to footer

लोकसभा निवडणूकीवरून शालिनीताई पाटील यांचे अजित पवारांना सडे-तोड उत्तर……

लोकसभा निवडणुकीला मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार यांचा शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कडून भारी बहुमताने पराभव झालेला होता. हाच मुद्दा पकडून माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? अशी टीका शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.

माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यावरून निशाणा साधला. अजित पवारांना जरंडेश्वर कारखान्यातून आपल्या घरी माघारी घालवून कोरेगाव मतदारसंघात क्रांती घडवायची आहे असे पाटील यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, कारखान्याचे दहा हजार टनांचे एक्स्पांशन कोणाला विचारुन केलं? असा सवालही त्यांनी केला. तसेच माझा अडीच हजार टन क्षमतेचा कारखाना मला पुन्हा पाहिजे. त्या व्यतिरिक्त जे काय असेल ते तुम्ही बारामतीला उचलून न्या, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरूनही पाटील यांनी टीकास्त्र सोडले. मावळ मतदारसंघात जे झालं ते बरोबरच झालं, अशी टीका त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, निवडणूक लढण्याआधी काही कामे करावी लागतात. लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? आणि एकाच परिवारातील किती जणांनी निवडणूक लढवायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

Leave a comment

0.0/5